प्रणव बिर्जे | The News Bulletins
गोवा: श्री दामोदर नाट्य मंडळ, फातोर्डा-मडगाव आयोजित ‘जांवय शेणलो मावड्या’ या २ अंकी कोकणी नाटकाने सध्या संपूर्ण गोव्यात धुमाकूळ घातला आहे.
तुळशीदास धोणशीकर लिखित आणि दीपराज नाईक मडकईकर दिग्दर्शित या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
१९ जानेवारी २०२६ रोजी फातोर्डा येथून सुरू झालेला हा प्रवास राय, काणकोण, बेतुल आणि मडगाव अशा विविध भागांतून यशस्वीपणे पार पडला आहे. एप्रिल महिन्यात या नाटकाचे सलग प्रयोग झाले असून, नुकतेच शिरोडा आणि उसगाव येथील प्रयोग हाऊसफुल्ल झाले आहेत.
नाटकाची ही यशस्वी मालिका अशीच सुरू राहणार असून, येत्या २४ एप्रिलला माळकर्णे आणि २ मे रोजी गोगल-मडगाव येथे पुढील प्रयोग होणार आहेत.
अनिल रायकर, उमेश बांदोडकर, प्रज्योती नाईक,वृंदावन रायकर, दीपराज मडकईकर आणि महेंद्र वायंगणकर अश्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेले हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. तन्मय रसईकर यांचे पार्श्वसंगीत आणि युनिटी इव्हेंट्सचे चोख नियोजन या नाटकाच्या यशात मोलाचा वाटा उचलत आहे.
बुकिंगसाठी संपर्क:
Contact for Bookings: 9823065486.

