Pranav Birje | The News Bulletins
रत्नागिरी | महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा सजीव उत्सव “नाटक तमाशाचं” आता पुन्हा रंगमंचावर अवतरत आहे. स्वामीराज थिएटर्स निर्मित या नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन रत्नागिरीतील प्रतिभावान कलाकार ऋषिराज धुंदूर यांनी केले असून, लेखन रंगशाळा प्रमुख प्रदीप शिवगण यांचे आहे.
गण, गवळण, छक्कड, भारूड, पोवाडा, नमन, जाखडी, बतावणी आणि लावणी अशा विविध लोककलांच्या प्रकारांनी सजलेला हा प्रयोग थेट लाईव्ह गायन व नृत्याच्या माध्यमातून रंगमंचावर साकारला जाणार आहे. विशेष म्हणजे, तमाशाबद्दलच्या गैरसमजांना दूर करून या कलापरंपरेचा मूळ आत्मा प्रेक्षकांसमोर आणण्याचा संवेदनशील आणि प्रामाणिक प्रयत्न या सादरीकरणातून होत आहे.
हा प्रयोग पहिल्यांदा २०१४ साली खातू नाट्यमंदिरात सादर करण्यात आला होता. त्यावेळी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची धामधूम सुरू असतानाही हा प्रयोग हाऊसफुल झाला होता. त्यानंतर जयगड येथेही प्रेक्षकांनी या नाट्यप्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा “जुन्या ढंगात पण नव्या रंगात” हा नाट्यप्रयोग रंगभूमीवर येत असून, रत्नागिरीकरांना एक वेगळा सांस्कृतिक अनुभव देणार आहे.
प्रयोगांचे वेळापत्रक
प्रयोग क्र. १ : २७ सप्टेंबर, आडीवरे महाकाली मंदिर
प्रयोग क्र. २ : ३० सप्टेंबर, भवानी मंडप, जयगड (बाजारपेठ)
प्रयोगासाठी संपर्क :
ऋषिराज धुंदूर – ☎️ ७३८७७७२४८५
मिथुन पवार – ☎️ ९९६००५९२१७
दीपक माणगांवकर – ☎️ ७०८३४४५३८३
DJ च्या दणदणाटापेक्षा आपल्या पूर्वजांनी दिलेला लोककलेचा ठेवा जपण्याचा वसा या प्रयोगातून उचलला गेला आहे. तुतारीच्या नादात, ढोलकीच्या तालावर, मृदंगाच्या गंजीत आणि हार्मोनियमच्या स्वरात प्रेक्षकांना आपला खरा वारसा अनुभवायला मिळणार आहे.
“नाटक तमाशाचं” – प्रबोधनासोबतच मनोरंजनाने सजलेला, लोककलेचा खरा ठेवा!
“नाटक तमाशाचं” पुन्हा रंगभूमीवर — जुन्या ढंगात, नव्या रंगात

