Pranav Birje | The News Bulletins
साई सेवक डहाणूकरवाडी मित्र मंडळाचा भव्य ‘साई भंडारा’ उत्साहात संपन्न
मुंबई: नवीन वर्षाचे स्वागत आणि साईबाबांच्या आशिर्वादाने, साई सेवक डहाणूकरवाडी मित्र मंडळाने गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी भव्य ‘साई भंडारा’ (महाप्रसाद) आयोजित केला होता. डहाणूकरवाडी येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित केलेल्या या महाप्रसादाचा लाभ अनेक साई भक्तांनी घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री. विकी काशिनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष बाबीराज सिंह, सचिव सचिन कदम, खजिनदार निलेश कुदळे, उपसचिव निखील हुमने आणि उपखजिनदार ताराचंद राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले.

गेल्या ८ वर्षांपासून ते दर गुरुवारी खिचडी प्रसादाचे वाटप करत आहेत. हा उपक्रम दुपारी १२ ते ४ या वेळेत राबवला जातो आणि त्याद्वारे दर आठवड्याला सुमारे २५० ते ३०० लोकांना प्रसादाचा लाभ मिळतो.
या उपक्रमाला अनिल कोकणे साहेब, नितीन दांडेकर, प्रकाश सोळंकी आणि राजु सिंग यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, तसेच प्रकाश गिरी आणि देव मिश्रा (बबलू) , सोनाली जाधव देव मिश्रा ,लीना दहेकर पटेल यांचे मोलाचे सल्लागार म्हणून सहकार्य मिळाले. कार्यक्रमात प्रेम मयाल गणेश राठोड, नागेश, सुरज बेंद्रे आणि इतर साई सेवकांचाही सक्रिय सहभाग होता.


नववर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित केलेल्या या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. मंडळाने सहकार्य करणाऱ्या सर्व भक्तांचे आणि रहिवाशांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.


