विलासराव देशमुख यांचा वारसा जोपासत,आ धिरज देशमुख राहुल पाटील यांच्या साठी कोल्हापुरात.
Pranav Birje| Senior Correspondent
कोल्हापूर:
राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख आणि करवीरनगरीचे ज्येष्ठ नेते पी़ एऩ पाटील यांची मैत्री सर्वस्रुत होती़ त्यांच्या मैत्रीचे अनेक दाखले आजही दिले जातात़. पी़ एऩ पाटील यांच्या प्रत्येक निवडणुकीत विकासरत्न विलासराव देशमुख करवीरनगरतीत जाऊन पाटील यांच्या प्रचारात सहभागी होत असत़.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीरनगरीत युवकाशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात आमदार धिरज देशमुख यांनी सहभागी होत तरुणांशी संवाद साधला़
या मतदारसंघात पी़ एऩ पाटील यांचे सुपुत्र राहूल पाटील ईच्छूक उमेदवार आहेत़ आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी करवीरनगरीत जाऊन राहूल पाटील यांच्यासमवेत युवकांशी संवाद कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला़,त्यांच्या या सहभागाने विलासरावजी आणि पी़ एऩ पाटील यांच्या मैत्रीचा वारसा आमदार धिरज देशमुख व राहूल पाटील पुढे नेत असल्याचे दिसुन येत आहे़.

कोल्हापूर मधील करवीर मतदार संघातील काँग्रेस आमदार पी़ एऩपाटील यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले़ होते. पी एन पाटील यांचा वारसा त्यांचे पुत्र राहुल पाटील जोपासत आहेत.
करविर मतदारसंघात नवमतदार तरुणांशी संवाद या कार्यक्रमात बोतलाना आमदार धिरज देशमुख म्हणाले, विलासरावजी देशमुख आणि पी़ एऩ पाटील यांची १९८० पासूनची मैत्री होती़ ती मैत्री दोघांनीही शेवटपर्यंत कायम ठेवली़ राहुल पाटील हे उद्याचे पी़ एऩ पाटील आहेत. पी़ एऩ पाटील यांच्या कार्याची झलक राहुल पाटील यांच्यात दिसून येते. विलासरवजी देशमुख व पी़ एऩ पाटील यांच्या मैत्रीचा तोच वारसा पुढेदेखील चालू ठेवत राहूल पाटील व राजेश पाटील यांच्यासोबत माजी मंत्री आमदार अमित देशमुख व मी कायम पाटील कुटूंबियांना साथ देत त्यांच्या पाठीशी उभे आहोत़. राहुल पाटील यांनी परिवारातील दु:ख बाजूला सारुन जी माणसं पी़ एऩ पाटील यांनी जोडली, जपली त्यांच्या सेवेसाठी तत्पर झाले आहेत.करवीर विधानसभा निवडणूकीमध्ये येथील मतदार राहुल पाटील यांच्या उमेदवारीला खंबीर अशी साथ देतील व त्यांना निवडून आणतील असा विश्वास आपणास आहे.
स्व़ पी़ एऩ पाटील जनसामान्यांच्या प्रश्नासाठी श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिले. राहुल पाटील यांना सहकार क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. मागील पाच दशक विलासराव देशमुख व पी़ एऩ पाटील यांची मैत्री सगळ्यांनी पाहिली आता यापुढे देखील तोच वारसा जोपासत देशमुख व पाटील परिवार तोच स्नेह आणि तोच जिव्हाळा कायम ठेवेल असे आमदार धिरज विलासराव देशमुख यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात राहुल पाटील यांनी जनतेशी प्रामाणिक राहू असे सांगून कायम मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमास राजेश पाटील यांच्या सह असंख्य तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.