


• ही सुविधा क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी, उत्पादनातील नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि ग्राहकांना यश मिळवून देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचे समर्थन करते
• ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरने भारताच्या विकासासाठी लुब्रिझोलच्या 150 दशलक्ष यूएसडी गुंतवणुकीचा विस्तार केला
मुंबई, भारत – 11 एप्रिल 2024:स्पेशॅलिटी केमिकल्समध्ये अग्रगण्य असलेल्या, लुब्रिझोलने अनेक बाजारपेठा आणि उद्योगांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक यश मिळवण्यासाठी आणि लोकल टॅलेंटचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसोबत एकत्र काम करण्यासाठी, एक धोरणात्मक केंद्र म्हणून, पुण्यात नवीन ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) सुरू केले.
लुब्रिझोल ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हे एम्बेसी टेक झोन, हिंजेवाड़ी, पुणे येथे असलेल्या लुब्रिझोलच्या नवीन सुविधेचा एक भाग आहे. जीसीसी कॅम्पस हे लीड गोल्ड प्रमाणित आणि एक सुरक्षित, आरोग्यदायी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक कार्यक्षेत्र सक्षम करण्यासाठी योग्य आहे. चांगल्या डिझाइन आणि एर्गोनॉमिक वर्कस्पेस व्यतिरिक्त, 42,000-चौरस-फूट सुविधेमध्ये वेलनेस रूम, एक मनोरंजन क्षेत्र, एक प्रशिक्षण क्षेत्र आणि नैसर्गिक प्रकाश देणाऱ्या हडल रूम्स आहेत. ग्राहक अनुभव केंद्र लुब्रिझोलच्या विज्ञानाबद्दल माहिती देतो. इंजिनिअरिंग, सप्लाय चेन, टेक्नॉलॉजी, फायनान्स, प्रोक्युरमेन्ट, लीगल आणि ह्यूमन रिसोर्स या क्षेत्रात काम करणाऱ्या 200 हून अधिक प्रादेशिक कर्मचाऱ्यांना पुढील वर्षभरात जीसीसी मध्ये नोकऱ्या देण्याची अपेक्षा आहे.
लुब्रिझोलचा भारतात मोठा इतिहास आहे, 1966 पासून जेव्हा कंपनीने वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रांना पाठिंबा देण्यासाठी रासायनिक पदार्थांचे उत्पादन सुरू केले. तेव्हापासून, ल्युब्रिझोलने भारतातील आणि आसपासच्या प्रदेशातील लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारला आहे जे इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्सद्वारे गतिशीलता वाढवण्यास, आरोग्य सुधारण्यास आणि आधुनिक जीवन सुधारण्यास मदत करते. कंपनीचे सध्या भारतभर कर्मचारी आहेत जे विविध क्षेत्रांतर्गत व्यावसायिक कार्यालये, प्रयोगशाळा आणि उत्पादन प्रकल्पांद्वारे कार्यरत आहेत.
2023 मध्ये, लुब्रिझोलने गुजरातमधील विलायत येथे जगातील सर्वात मोठा सीपीव्हीसी रेझिन प्लांट उभारण्यासाठी, गुजरातमधील दहेज येथे त्याची साइट क्षमता दुप्पट करण्यासाठी, नवी मुंबईत ग्रीस लॅब उघडण्यासाठी आणि देशात लक्षणीय रोजगार वाढ आणि नवकल्पना सक्षम करण्यासाठी 150 दशलक्ष यूएसडी पेक्षा जास्त गुंतवणूकीची घोषणा केली.
*जेटी जोन्स, सिनियर वाईस प्रेसिडेंट, हाय ग्रोथ रिजन, लुब्रिझोल म्हणाले,* “भारत हे निःसंशयपणे सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि प्रादेशिक आणि जागतिक ग्राहकांना यश आणि नवकल्पना मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या टॅलेंटचे महत्त्वाचे केंद्र आहे.”
भावना बिंद्रा, मॅनेजिंग डायरेक्टर – भारत, मिडल ईस्ट आणि आफ्रिका, लुब्रिझोल, म्हणाल्या,” जीसीसी हा आमच्या जागतिक टीमचा एक एकीकृत विस्तार आहे. हे व्यवसाय प्रक्रिया आणि डिजिटल क्षमता उपलब्ध करणारे प्रादेशिक आणि जागतिक केंद्र म्हणून काम करते जे लुब्रिझोलला गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण करण्यात आणि चांगले व्यवसाय परिणाम शोधण्यात मदत करेल. आजचा दिवस आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे कारण आम्ही भविष्यातील अनेक संधीची वाट पाहत आहोत.
अभिषेक जैन, इंडिया जीसीसी लीडर, लुब्रिझोल म्हणाले, “पुण्यात जीसीसी चे उद्घाटन हे आमच्या टीमसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जे आम्हाला आमच्या तांत्रिक क्षमता आणि ऑपरेशनल उत्कृष्टता वाढविण्यासाठी जागतिक दर्जाची प्रतिभा मिळवण्यास आणि विकसित करण्यास सक्षम करते. हे आम्हाला भारतातील आणि जगभरातील आमच्या ग्राहकांना आणखी नाविन्यपूर्ण मार्गांनी सेवा देण्यास सक्षम बनवतील.”
जीसीसी चे उद्घाटन भारतातील कंपनीची वचनबद्धता आणि विकास, तसेच सर्वोत्कृष्ट श्रेणीतील सेवा आणि ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सहकार्याचे प्रदर्शन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ओपन लुब्रिझोल जीसीसी भूमिकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया भेट द्या: लुब्रिझोल कॉर्पोरेशन जॉब्स.
