Pranav Birje | Senior Correspondent
तेजस देऊस्कर दिग्दर्शित देवमाणूस या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या एक से एक कलाकारांच्या टीम मध्ये आता आदरणीय अभिनेते सुबोध भावे सामील झाले आहेत. अभिनेता सुबोध भावे, महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दिग्गज कलाकारांसोबत यंदा स्क्रीन शेअर करणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे ज्यात आकर्षक आणि उच्च दर्जाचे नाटक संपूर्ण महाराष्ट्र आणि बाहेरील प्रेक्षकांना आकर्षित करेल आणि अनुभवायला मिळेल.
बालगंधर्व, आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली, यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अविस्मरणीय अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले सुबोध भावे, ज्यांची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे जे नेहमी आपल्या प्रत्येक भूमिकांमध्ये स्वतःला बुडवून घेण्याची क्षमता ठेवतात. कॉम्प्लेक्स, स्टेबल यांसारख्या विविध लेवलच्या पात्रे साकारण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल त्यांचं अनेकदा कौतुक झालं आहे आणि त्यांचा हा समावेश आणि योगदान नक्कीच चित्रपटाच्या कथेला एक नवीन आयाम देईल.
देवमाणूसच्या कलाकारांसोबत सामील होण्याबद्दल अभिनेता सुबोध भावे म्हणाले , “मला यापूर्वी दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दोघांसोबत स्वतंत्रपणे चित्रपटात काम करण्याचा बहुमान मिळाला आहे, परंतु देवमाणूसमध्ये पहिल्यांदाच त्यांच्यासोबत एकत्र काम करणे हा खरोखरच माझ्यासाठी एक रोमांचक अनुभव आहे. या अविश्वसनीय चित्रपटाचा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे आणि आमचे सामूहिक प्रयत्न पाहून प्रेक्षकांकढून कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहण्यासाठी मी आतुर आहे.”
देवमाणूस या चित्रपटाचे इतर तपशील जरी गुपित असले तरी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आधीच एक प्रकारची कास्टिंगची माहिती देऊन निश्चितच या सिनेमासाठी प्रेक्षकांची आवड निर्माण केली आहे.
Actor Subodh Bhave onboard for Tejas Deoskar’s Devmanus!!
